‘दक्षिणेकडचे डोनाल्ड ट्रम्प’ अर्थात ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो हे आपल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत!
बोल्सोनारो यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षातच कलाकार, विचारवंत, पत्रकार, ॲमेझॉन वर्षावनांच्या आत किंवा जवळपास राहणारे मूळनिवासी आणि पर्यावरणवादी या सर्वांबरोबर त्यांनी अघोषित युद्ध पुकारलं आहे. ते सत्तेवर आल्यापासून गरीब वस्त्यांत राहणाऱ्या काळ्या रंगाच्या व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. स्वतंत्र विचाराचे पत्रकार आणि माध्यम-कंपन्यांना वाढत्या विरोधाला तोंड द्यावं लागत आहे.......